राजकीय

राज्यात ट्विस्ट पे ट्विस्ट !

देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून मोठी तयारी केली जात आहे. तसेच इच्छुक उमेदवारांनी प्रचार सुरू केला आहे. दरम्यान राज्यात बारामतीमधील लोकसभेची निवडणूक चुरशीची असते. यंदा नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगणार आहे. या मतदारसंघातून रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे. शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेले लक्ष्मण खाबिया यांनी सुनंदा पवार यांच्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून अर्ज घेतला आहे. सुनंदा पवार यांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज घेतला आहे.
बारामती मतदारसंघात उमेदवारांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. या लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे आणि महायुतीकडून सुनेत्रा पवार या गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तसेच या मतदारसंघात अर्ज काही कारणांनी छाननीमध्ये रद्द झाल्यास उमेदवारीबाबात प्रश्न उभा राहू नये, म्हणून दोन्ही पक्षांनी अधिकचा उमेदवारी अर्ज घेतला आहे.
दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून उमेदवारी अर्ज घेण्यात आले आहेत. सुनंदा पवार यांच्या नावाने उमेदवारी अर्ज घेण्यात आला आहे, तसेच अजितदादा पवार यांच्या नावानेही अर्ज घेण्यात आला आहे. 

Related Articles

Back to top button