क्राईम

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीचे सर्वस्व लुटले

संपूर्ण राज्यात अलीकडे गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.  पुण्यात पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या एका तरुणीवर पोलिस उपनिरीक्षकाने बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीने तरुणीचा जामखेड येथील एका रुग्णालयात गर्भपातदेखील केला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरण माणिक महामुनी (वय ३८, रा. नागपूर) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपी उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणी ही पोलिस भरतीची तयारी करते. यातूनच तिची आणि किरणशी ओळख झाली होती. त्याने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तसेच तिला लग्न करण्याचे आमिष दाखवले. यावेळी किरणने तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला.
यातून पीडित तरुणी गर्भवती झाली. त्यानंतर त्याने तिला नगर जिल्ह्यातील जामखेड परिसरात असलेल्या एका रुग्णालयात नेत या ठिकाणी तिचा गर्भपात केला. तसेच या प्रकरणी कुणाला काही सांगितल्यास मारण्याची धमकी तरुणीला दिली. दरम्यान, धमकावून तिचा गर्भपात केला. यानंतर तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Related Articles

Back to top button