राजकीय

मोदींची हवा, या भ्रमात कोणी राहू नका

देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून मोठी तयारी केली जात आहे. तसेच इच्छुक उमेदवारांनी प्रचार सुरू केला आहे. दरम्यान मतदानाच्या दिवशी 12 वाजेपर्यंत सर्व मतदार आपल्याला बूथवर न्यायचे आहेत. सर्वांनी मतदान केले पाहिजे. मोदींची हवा आहे, या भ्रमात कोणी राहू नये, असे खळबळजनक वक्तव्य नवनीत राणा यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने निवडणूक काळात त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यात लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू आहे. अशात भाजपने महायुतीकडून नवनीत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नवनीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केलेल्या वक्तव्याने चर्चेत आल्या होत्या. अशात आता त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भाष्य केले, त्यामुळे राजकीय वर्तृळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
ही निवडणूक आपल्याला ग्रामपंचायत सारखी लढायची आहे. 12 वाजेपर्यंत सर्व मतदार आपल्याला बूथवर न्यायचे आहेत. सर्वांनी मतदान केले पाहिजे. मोदींची हवा आहे, या फुग्यात कोणी राहू नये. एवढी मोठी यंत्रणा असून 2019 मध्ये एक अपक्ष उमेदवार निवडून आली होती आणि आपला झेंडा गाडून गेली होती, असे वक्तव्य नवनीत यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button