राजकीय
भाजप उमेदवारांची नवी यादी जाहीर

देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून मोठी तयारी केली जात आहे. तसेच इच्छुक उमेदवारांनी प्रचार सुरू केला आहे. दरम्यान, सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपाने उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आता महायुतीकडून उदयनराजे हे अधिकृत उमेदवार असतील. त्यामुळे साताऱ्यातील मुख्य लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून, उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे यांच्यात थेट ‘सामना’ होणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची बारावी यादी आज जाहीर केली आहे. महाराष्ट्रामधून सातारा मतदारसंघासाठी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. उदयनराजे यांना भाजपाने अधिकृत उमेदवारी दिली आहे.