राजकीय

महायुतीत नवा ट्विस्ट

देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून मोठी तयारी केली जात आहे. तसेच इच्छुक उमेदवारांनी प्रचार सुरू केला आहे. दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावरून शिंदे गट आणि भाजपामध्ये रस्खीखेच सुरू आहे. या जागेवर भाजपाकडून केंद्रीय नारायण राणे तर शिंदे गटाकडून किरण सामंत इच्छुक आहेत. सामंत यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तर राणेंनी थेट प्रचाराला सुरूवात केली. परिणामी या जागेचा तिढा वाढला आहे. अशातच आता अशातच शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी राणेंना मतदान करा, असे आवाहन केले आहे.
या जागेवर भाजपा आणि शिंदे गट यांच्यात अजूनही रस्सीखेच सुरू आहे. अशातच राणे यांनी चार उमेदवारी अर्ज घेतले होते. आता राणे यांना निवडून देण्याचे आवाहन केसरकर यांनी मतदारांना केले आहे. त्यामुळे राणेच हे संभाव्य उमेदवार असतील, अशी शक्यता आहे.

Related Articles

Back to top button