उन्हाळ्यात थंडावा देणारे कोकम सरबत आरोग्यासाठी बेस्ट
उन्हाळ्यात उष्णतेपासून बचाव करण्यासाठी थंडगार पेय प्यायले जाते. उन्हाळ्याच्या हंगामात आराम मिळवण्यासाठी एक अनोखा उपाय उपलब्ध आहे.
कोकम हे एक प्रकारचे फळ आहे, ज्याचे छोटे तुकडे आधी वाळवले जातात आणि नंतर पाण्यात बुडवून त्याचा अर्क काढता येतो. हे कोकणी पेय तुम्हाला उन्हाळ्यात हायड्रेट ठेवण्यासाठी योग्य आहे. तर मग या उन्हाळ्यात काहीतरी वेगळं करून बघा, ज्यामुळे उष्णतेपासून आराम तर मिळेलच पण त्याचबरोबर आरोग्यासाठीही अनेक फायदे होतील.
हे फळ फक्त खाण्यासाठीच स्वादिष्ट नाही तर अनेक फायद्यांनी परिपूर्ण आहे. त्यामुळेच हे फळ आरोग्य तज्ज्ञांमध्येही लोकप्रिय आहे.
पचन सुधारण्यासाठी, जळजळ कमी करण्यासाठी आणि ऍसिडिटीपासून आराम देण्यासाठी शतकानुशतके कोकमचा वापर पारंपारिकपणे केला जात आहे. पोषक तत्वांनी भरपूर असलेले कोकम शरीराला थंड ठेवण्यास मदत करते आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराला थंड करण्यासाठी पेय शोधत असाल तेव्हा तुम्ही कोकम शरबत बनवू शकता. त्याची चव तर अतिशय चविष्ट तर असतेच पण आरोग्यासाठीही अनेक फायदे होतात. हा थंडगार सरबत उन्हाळ्यासाठी उत्तम आहे.