ब्रेकिंग! डिजिटल पत्रकारांना खुशखबर

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात डिजिटल क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांची संख्या लक्षणीय आहे. युट्युब, वेबसाईट, ब्लॉगवर बातम्या प्रसारित करून अनेक राजकीय नेत्यांना प्रवाहात आणण्याचा कार्य डिजिटल पत्रकार करतायत. युट्युब, वेबसाईट, ब्लॉग क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांनी आज दंड थोपटले आहे. काल दुपारी शासकीय विश्रामगृहात बैठक संपन्न झाली.
बैठकीत डिजिटल क्षेत्रात काम करणारे पत्रकार आणि कॅमेरामन मोठ्या संख्येने हजर होते. सर्वांनी एकत्रित येऊन राज्यपातळीवर डिजिटल पत्रकार संघाची स्थापना केली. डिजिटल क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांना दुय्यम दर्जा देऊ नये. पत्रकारिता क्षेत्रात सन्मान मिळावा, त्यांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार कसा लावता येईल या सर्व बाबींवर विचारविनिमय बैठकीत झाला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जमीर शेख, यशवंत पवार, इरफान शेख, अक्षय बबलादी, इलियास सिद्दीकी उपस्थित होते. प्रस्ताविक अक्षय बबलादी यांनी केले तर अध्यक्षीय भाषण यशवंत पवार यांनी केले.
जमीर शेख, इरफान शेख, आणि इलियास सिद्दीकी यांनी मनोगत व्यक्त करताना डिजिटल पत्रकारांसाठी स्थायी कार्यालय उपलब्ध करून देणे, पत्रकार परिषद घेण्याची व्यवस्था करणे, पत्रकारांना आरोग्य विषयक सुविधा पुरवणे, पत्रकारांच्या पाल्यासाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे, कायदेशीर बाबींचा अभ्यास करून घेणे, विविध राजकीय नेत्यांच्या पत्रकार परिषदा उपलब्ध करून देणे, वरीष्ठ अधिकाऱ्यांचे वार्तालाप आयोजित करणे आदी कामकाज करणार असल्याची माहिती दिली. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात डिजिटल क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांनी आणि कॅमेरामन यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवीन संघटनेला शुभेच्छा दिल्या. डिजिटल पत्रकारासाठी नवंनव्या योजना राबविण्यात आम्ही देखील हातभार लाऊ, खंबीरसाथ देऊ, असे आश्वासन दिले.
यावेळी श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी, सिद्धलिंग नवले, प्रदीपकुमार शिंदे, अजमेर शेख, बंदेनवाज शेख, सादिक मुजावर, अकिब मडकी, मोहसीन बागवान, सद्दाम शेख, उजेफ इनामदार, शिवानंद येरटे, सागर इप्पलपल्ली, आशिष भुदत्त, सादिक शेख, विश्वनाथ बिराजदार, सैफन शेख, नागार्जुन राऊळ, शाहनवाज शेख, इब्राहिम मुजावर,इम्रान सय्यद, विजयश्री गुळवे, मोहसीन कोतकुंडे, प्रसाद जगताप, साकीब शेख, प्रसाद दिवानजी, वाहिद शेख सह आदी डिजिटल पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.