आजच्या पिढीतील मुली चित्रपटगृहात बसून रश्मिका हिला मारहाण सुरु असताना जेव्हा टाळ्या वाजवत होत्या तेव्हा मी समानता या विचारांना श्रद्धांजली दिली, असे वक्तव्य लोकप्रिय गीतकार स्वानंद किरकिरे यांनी ‘ॲनिमल’ हा चित्रपट पाहून केले आहे. एकीकडे ‘ॲनिमल’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरत असताना दुसरीकडे स्वानंद यांनी या चित्रपटावर प्रचंड टीका केली आहे.
स्वानंद यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये स्वानंद म्हणाले, शांताराम यांचा औरत, गुरु दत्त यांचा साहेब बीवी और गुलाम, हृषिकेश मुखर्जी यांचा अनुपमा, श्याम बेनेगल यांचा अंकुर, भूमिका, केतन मेहता यांचा मिर्च मसाला, विकास बहल यांचा क्वीन शूजीत सरकार यांचा पीकू यांसारख्या अनेक सिनेमांनी मला महिलांचे अधिकार आणि स्वायत्तताचे सन्मान ठेवायला शिकवले.
स्वानंद पुढे म्हणाले की, पुरुष जो तुमचा आदर करत नाही आणि तुमच्यावर अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करत आहे. आजच्या पिढीतील मुली चित्रपटगृहात बसून रश्मिका हिला मारहाण सुरु असताना, जेव्हा टाळ्या वाजवत होत्या, तेव्हा मी समानता या विचारांना श्रद्धांजली दिली. सिनेमा पाहिल्यानंतर मी खूप उदास, निराश होऊन घरी आलो.