देश - विदेश

क्रिकेटर ऋषभ पंतच्या गाडीचा भीषण अपघात

टीम इंडियाचा स्टार खेळाडू ऋषभ पंतच्या गाडीचा पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये पंत गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर मॅक्स दिल्ली रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात तो दिल्लीहून घरी परत येत असतांना हम्मदपूरजवळ झाला. पंत हा आज सकाळी स्वत: गाडी चालवत घरी जात होता. यावेळी त्याचे गडीवरील नियंत्रण सुटल्याने दिल्ली-डेहराडून महामार्गावर त्याची कार दुभाजकाच्या रेलिंगला धडकली. यानंतर ऋषभच्या कारला आग लागली. 

यावेळी येथील काही स्थानिक नागरिकांनी पंतला गाडीतून बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले. ऋषभच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहेत. पंतने नुकतेच भारत बांग्लादेश दरम्यान झालेल्या कसोटी सामन्यात चांगली कामगिरी केली. या दौऱ्यावरून तो घरी परत येत होता. यावेळी त्याची गाडी नारसन येथे दुभाजकाला धडकली.

Related Articles

Back to top button