खुशखबर! देशात आता कुठेही मतदान करता येणार

राष्ट्रीय निवडणूक आयोग सध्या मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. हा निर्णय प्रत्यक्षात आला तर देशात कुठेही मतदान करणे शक्य होणार आहे. निवडणूक प्रक्रियेत बदल करण्याचा निर्णय निवडणूक आयोग घेणार आहे.
रिमोट मतदान करण्याची सुविधा देण्यासाठी आयोगाने जयत तयारी केली आहे. दरम्यान यासाठी निवडणूक आयोगाने देशातील राज्यांकडे मते मागवली आहेत.
या प्रक्रियेबाबत सर्व राज्यांना लिखित स्वरूपात आपले मत द्यावयाचे आहे. तसेच येत्या 16 जानेवारी रोजी देशातील आठ राजकीय पक्ष व 57 प्रादेशिक पक्षांच्या प्रतिनिधींना याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या या मोठ्या निर्णयामुळे अनेक मतदारांना मतदान करणे शक्य होणार आहे.
विशेष म्हणजे मतदान करण्यासाठी आपल्या घरी किंवा राज्यात जाण्याची गरज भासणार नाही. या निर्णयामुळे नोकरी, शिक्षण व इतर कारणासाठी गाव सोडून गेलेल्या लोकांना या सुविधेने कुठूनही मतदान करणे शक्य होणार आहे.