अजितदादा राजकारणातून बाहेर पडणार?

सत्ताधाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विधान केले होते. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी, कुणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा हे जनता ठरवते.
माझी एंट्री झाल्यापासून पवारांना भीती वाटत आहे. आमचा करेक्ट कार्यक्रम करण्याची त्यांच्यात हिंमत नाही. त्यांचा केव्हा करेक्ट कार्यक्रम होईल, हे २०२४मध्ये जनता ठरवेल, असे ते म्हणाले होते. त्यावर पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. मी तर राजकीय संन्यास घेण्याचा विचार करत आहे, असे ते म्हणाले.
अरे बापरे, मला तेव्हापासून झोपच येईना हो. हे ऐकल्यापासून आमच्या सगळ्यांची झोप हरपली आहे. बावनकुळेंसारखा एवढा मोठा ताकदीचा नेता अशा पद्धतीने आव्हान देतो. मी तर विचार करतो, राजकारणच सोडून द्यावे. राजकीय संन्यास घ्यावा. २०२४ मध्ये असा अपमान होण्यापेक्षा संन्यास घेतलेला बरा, असे ते म्हणाले.