देश - विदेश
एक- दोन नाही तर तब्बल दोनशे गाड्यांची एकमेकांना धडक

वर्षभरातील जगातील सर्वात मोठा अपघात हा चीनमध्ये घडला आहे, कारण दाट धुक्यांमुळे चीनच्या हेनान प्रांतातील झेंग्झौ शहरात एक नाही दोन नाही तर तब्बल 200 गाड्या एकमेकांवर जाऊन आदळल्या आहेत. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
थंडीचा महिना सुरु असून दाट धुक्याचे जाळे ठिकठिकाणी दिसून येत आहेत. अशात महामार्गावरून गाडी चालवणे कठीण झाले आहे. दाट धुक्यामुळे गाडीचा वेग आणि अंदाज घेणे महत्त्वाचे ठरते. मात्र, असे असताना गाडी चालवताना एक चूक चांगलीच महागात पडू शकते. त्याचाच प्रत्यय चीनच्या हेनान प्रांतातील झेंग्झौ शहरात वाहनचालकांना आला आहे.