महाराष्ट्र

विरोधातील महिला देखील माझ्यावर फिदा

  • राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला. खडसे यांनी चाकणकर यांच्यावर मेकअपवरून टीका केली. खासदार सुप्रिया सुळे यांना खुश करण्यासाठी खडसे यांनी हे विधान केल्याचे चाकणकर यांनी म्हटले आहे. 
  • दरम्यान, खडसे यांनी केलेल्या टीकेवरून चाकणकर यांनी त्यांना टोला लगावत विरोधातील महिलाही माझ्यावर फिदा असल्याचे वक्तव्य केले. चांगले मेकअप करून आणि पक्षाच्या सर्व कार्यक्रमाला हजर राहून तिथे मटकायचे एवढंच चाकणकर यांचे काम दिसत आहे. 
  • त्यांच्या पुण्यात घडलेल्या घटनांवर त्यांनी काहीच भाष्य केले नाही. त्या संपूर्ण महिला आयोगाच्या अध्यक्षा नाही तर त्या फक्त सत्ताधारी पक्षांच्या बाजूने बोलणाऱ्या महिला आयोग आहे, असे वक्तव्य खडसे यांनी करून चाकणकरांवर सडकून टीका केली. तर खडसे यांनी केलेल्या टीकेवर चाकणकरांकडून देखील पलटवार करण्यात आला आहे. 
  • गेल्या दोन वर्षांत केवळ साड्या आणि टिकलीवर आंदोलन करणारे पुढील पाच वर्षही त्यावरच आंदोलन करणार आहेत. कारण तेवढी वैचारिकता त्यांच्यात नाही. आपण कोणता विषय मांडावा… विरोधातील महिला देखील माझ्यावर फिदा आहेत, असं चाकणकरांनी म्हणत टोला लगावला.

Related Articles

Back to top button