देश - विदेश
कंबख्तको यूपी भेजो, हम इलाज करेंगे

- औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता, असे विधान समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर चांगलंच राजकारण तापले आहे. त्यांच्या या वक्तव्याचे महाराष्ट्राच्या विधानसभेत देखील पडसाद उमटले. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर उत्तर प्रदेशच्या विधानसभेत आझमींच्या विधानावरून मोठा गदारोळ पाहायला मिळाला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही आझमींवर हल्लाबोल केला आहे.
- यूपी विधानसभेत बोलतांना आदित्यनाथ चांगलेच आक्रमक झाले. ते म्हणाले की, अबू आझमींना पक्षातून हाकलून द्या. तसेच कंबख्त अबू आझमींना एकदा उत्तर प्रदेशला पाठवा, आम्ही उपचार करू. अबू आझमी यांना भारतात राहण्याचा अधिकार आहे का? याचे उत्तर समाजवादी पक्षाने द्यावे. समाजवादी पक्षाला भारताच्या वारशाचा अभिमान नाही. किमान ज्यांच्या नावाने ते राजकारण करतात, त्यांचे तरी ऐकले पाहिजे. डॉ. लोहिया म्हणाले होते की, भगवान राम, कृष्ण आणि शंकर हे भारतीय संस्कृतीचा आधार आहेत. आज समाजवादी पक्ष डॉ. लोहिया यांच्या तत्वांपासून, विचारांपासून दूर गेला. आज त्यांनी औरंगजेबाला आपला आदर्श म्हणून स्वीकारले आहे, अशी टीका आदित्यनाथ यांनी केली.