क्राईम

संतोष देशमुखांच्या क्रूर हत्येचे फोटो पाहून युवकाने आपले जीवन संपवले

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल करताना हे फोटो आणि व्हिडिओ पुराव्याच्या स्वरूपात सादर केले.

त्यानंतर माध्यमांमध्ये ते फोटो झळकल्यावर बीडमधील केज तालुक्यातील जाणेगाव येथील एका तरुणाने टोकाचे पाऊल उचलले. केज तालुक्यातील जाणेगाव येथील अशोक हरिभाऊ शिंदे (वय 23) या तरुणाने देशमुख यांची हत्या झाल्याचे फोटो पाहून आत्महत्या केली. देशमुख यांच्या मृत्यूनंतर केज येथे बंद पुकारण्यात आला होता. त्यात शिंदे यांनीही सहभाग घेतला होता. बंदनंतर घरी परतल्यानंतर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्येपूर्वी शिंदे यांनी पुण्यात राहणाऱ्या त्यांच्या बहिणीला, अश्विनी माने हिला फोन केला. या फोनमध्ये त्यांनी आपल्या मनातील अस्वस्थता व्यक्त करत मला टोकाचे पाऊल उचलावेसे वाटत आहे, असे म्हटले. बहिणीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र शिंदे यांनी काल संध्याकाळी गळफास घेत आपले जीवन संपवले.

Related Articles

Back to top button