क्राईम
ब्रेकिंग! रश्मिका मंदानावर काँग्रेस आमदाराचा खळबळजनक आरोप

- अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने ‘छावा’ सिनेमात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी येसुबाई भोसले यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असताना रश्मिका मात्र नव्या वादात सापडली आहे. बेंगळुरू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यास तिने नकार दिल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे चाहत्यांसह काही राजकीय नेत्यांनीही रश्मिकावर निशाणा साधला आहे. कर्नाटक काँग्रेसचे आमदार रवी गनिगा यांनी या प्रकरणात तिच्यावर गंभीर आरोप करत लवकरच पुरावे सादर करणार असल्याचे म्हटले आहे.
- या आरोपांनंतर अभिनेत्री रश्मिका हिच्या टीमने अधिकृत प्रतिक्रिया देत हे आरोप फेटाळले आहेत. रश्मिकाने बेंगळुरू चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यास नकार दिला आणि तिने भाषेबाबत अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या काही अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र, या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही आणि त्या पूर्णपणे खोट्या आहेत, असे रश्मिकाच्या टीमने स्पष्ट केले.
- रश्मिकाच्या टीमने हे आरोप फेटाळल्यानंतर काँग्रेस आमदार रवी गनिगा यांनी आपला दावा पुन्हा पुढे करत सांगितले की, आमच्याकडे ठोस पुरावे आहेत. रश्मिका हिला बेंगळुरू चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते, मात्र तिने कोणतेही वैध कारण न देता नकार दिला. रश्मिकाने कन्नड भाषेचा देखील अपमान केला आहे. त्यामुळे अशा वर्तनासाठी रश्मिकाला धडा शिकवला गेला पाहिजे का? रश्मिकाला अनेक वेळा बोलावण्यात आले. पण तिने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, असे त्यांनी सांगितले.