मनोरंजन
प्रसिद्ध कन्नड अभिनेत्रीचा भलताच कांड

- सोन्याच्या तस्करी प्रकरणी महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकाने कन्नड अभिनेत्री रान्या रावला केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. रान्या दुबईहून बेंगळुरूला आली होती. तिच्याकडे 14 किलो सोन्याचे बार सापडले असून तिने ते कपड्यांमध्ये लपवले होते. याशिवाय तिच्याकडे 800 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिनेही सापडले. मंगळवारी संध्याकाळी तिला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
- तपास अधिकाऱ्यांना संशय आहे की, ती बंगळूरू विमानतळावरून सक्रियपणे कार्यरत असलेल्या सोन्याच्या तस्करी टोळीचा भाग आहे. रान्या ही कर्नाटकातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी के. रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे. राव हे कर्नाटक राज्य पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. पोलिसांकडून सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, अभिनेत्री रान्या राव गेल्या 15 दिवसांमध्ये चारवेळा दुबईला प्रवास करून आली होती. हे लक्षात आल्यानंतर पोलिसांना तिच्यावर संशय बळावला. यानंतर सोमवारी रात्री तिला प्रथम तपासणीसाठी तसेच नंतर चौकशीसाठी रोखण्यात आले. तपासावेळी तिच्याकडून मोठ्या प्रमाणात सोने जप्त करण्यात आले. रान्या राव ही कन्नड सिनेक्षेत्रातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. रान्या राव ही मुळची कर्नाटक राज्यातील चिकमंगलूर जिल्ह्यातील आहे.