सोलापूर
ऋषभ पंतच्या अपघातानंतर बीसीसीआय अॅक्शन मोडवर

क्रिकेटपटू ऋषभ पंतचा शुक्रवारी सकाळी अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, दुभाजकाला धडकल्याने पंतची मर्सिडीज कार पूर्णपणे जळून खाक झाली. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ऋषभच्या पाठीला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेने क्रिकेट जगत हादरून गेले आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक रिकी पाँटिंग याने ऋषभच्या अपघातावर ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. पाँटिंगने लिहिले की, तो यावेळी पंतबद्दल विचार करत आहे आणि प्रार्थना करत आहे, आशा आहे की तो लवकरच त्याच्या पायावर उभा राहील.
ऋषभच्या या अपघातानंतर बीसीसीआय अॅक्शन मोडवर आले आहे. बोर्डाने ऋषभला ज्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे, त्याच्याशी थेट संपर्क साधला आहे. यासोबतच दिल्ली क्रिकेट असोसिएशनही ऋषभला सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करत आहे.