थंडीच्या दिवसांत श्वास घेण्यास त्रास होणे, नाक गळणे, आवाज बसणे वा घसा बसणे, घसादुखी, घसा खवखवणे अशा स्वरुपाचे त्रास होतात. हळदीचा चहा पिणे हा या समस्यांवरील प्रभावी उपाय आहे.
- हळदीचा चहा प्यायल्याने रोगप्रतिकारक क्षमतेत वाढ होईल. अनेक आजारांपासून संरक्षण होण्यास मदत होईल. आरोग्यासाठी हळदीचा चहा गुणकारी आहे. दररोज दिवसातून किमान एकदा हळदीचा चहा प्यायल्यास घशाशी संबंधित अनेक त्रासात आराम मिळतो. घशाची सूज कमी होण्यास मदत होते. डोक्याला झालेली दुखापत, हृदयविकार, अस्थमा अशा समस्यांनी पीडित असलेल्यांसाठी हळदीचा चहा गुणकारी आहे.