मनोरंजन

‘कंतारा’ स्टार ऋषभ म्हणाला, रश्मिकासोबत काम करण्यात इंटरेस्ट नाही

कंतारा या चित्रपटातून अभिनेता ऋषभ शेट्टीने यशाचे झेंडे रोवले आहेत. ऋषभच्या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. कांतारा या ब्लॉकबस्टरनंतर शेट्टीची लोकप्रियता खूप वाढली आहे.
ऋषभला त्याच्या एका मुलाखतीत विचारण्यात आले होते की, दाक्षिणात्य अभिनेत्रींपैकी समंथा रुथ प्रभू, रश्मिका मंदान्ना, कीर्ती सुरेश आणि सई पल्लवीसोबत काम करायला आवडेल? या प्रश्नावर त्याने उत्तर दिले, मी माझी स्क्रिप्ट पूर्ण केल्यानंतरच कलाकार निवडतो. नवोदितांसोबत काम करण्याला मी जास्त महत्त्व देतो, कारण त्यांच्यात कुठलाही अडथळा नसतो. मला हे कलाकार आवडत नाहीत.
कोणत्याही अभिनेत्रीचे नाव न घेता शेट्टी म्हणाला, मला ती आवडत नाही. पण मला सई पल्लवी आणि समंथा यांचे काम आवडते. आता ऋषभचं असं म्हणणं काय आहे हे तोच सांगू शकतो, पण रश्मिकासोबत काम करण्यात त्याला रस नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Related Articles

Back to top button