सात हजार कोटींच्या बिस्लेरी कंपनीवर पाणी सोडलं

उद्योगपती रमेश चौहान यांनी १९६९ मध्ये बिसलेरीचा ब्रॅड खरेदी केला होता. बिसलेरी इंटरनॅशनलचे १३३ प्लान्ट्स आहेत. भारतासह विविध देशांमध्ये कंपनीने आपले स्थान मजबूत केले आहे.
बिसलेरी ब्रॅड उद्योगपती रमेश चौहान यांनी एका व्यावसायिकाकडून खरेदी केला होता. या क्षेत्रात आपले स्थान मजबूत केल्यानंतर, केवळ एकूलती एक लेक जयंतीच्या नकारास्तव व्यवसाय विक्री करण्याची तयारी सुरु केली आहे. तो खरेदी करण्यासाठी टाटा कन्झ्युमर लिमिटेडसह अनेक कंपन्या स्पर्धेत आहेत.
जयंतीला बिसलेरीचा व्यवसाय पुढे नेण्यात इंट्रेस्ट नाही, असे चौहान यांनी सांगितले. भारतात बाटलीबंद पाण्याचा व्यापार २० हजार कोटी रुपयांचा आहे. वास्तविक जयंतीने सुरुवातीच्या काळात बिसलेरीच्या व्यवस्थापनाची धुरा सांभाळली होती. असे असले तरीही तिला भावी जबाबदारी घेण्याची इच्छा नाही.
वयाच्या २४ व्या वर्षी जयंतीने आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली बिसलेरीच्या व्यवसायात पदार्पण केले. तिने दिल्ली कार्यालय सांभाळले होते. त्यानंतर २०११ मध्ये मुंबई कार्यालयाचे व्यवस्थापन करायला सुरुवात केली. या दरम्यान जयंतीने बिसलेरीच्या एचआर, सेल्स आणि मार्केटिंगसारख्या विभागांची पूर्नरचना केली होती.



