गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या मान्सूनने पुन्हा एकदा दमदार एन्ट्री केली आहे. राज्यात विविध भागात जोरदार पाऊस बरसत आहे.
पावसाचा हा जोर पुढील सात दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, येत्या काही दिवसांत देशाच्या अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण छत्तीसगड आणि लगतच्या भागात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम-वायव्येकडे सरकत आहे आणि ते हळूहळू कमकुवत होऊन 18 ऑगस्टच्या सकाळपर्यंत गुजरातमध्ये पोहोचेल आणि अवशिष्ट चक्री वादळात रूपांतरित होईल.
दरम्यान पुढील सात दिवस गोवा, महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात पावसाळी हंगाम खूप सक्रिय राहील, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.