- इंदिरा काँग्रेसला विरोध असल्याने वसंतदादांचे सरकार मीच पाडले, अशी कबुली ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली. वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडण्यामागे आपलाच हात होता, अशी पहिल्यांदाच जाहीर कबुली देत पवार यांनी तो किस्साही सांगितला. पुण्यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
- इंदिरा काँग्रेस वेगळी झाली. स्वर्णसिंग काँग्रेस वेगळी साली. आम्ही लोक स्वर्णसिंग काँग्रेसमध्ये होतो, ज्यात यशवंतराव चव्हाण साहेब होते. निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत मिळाले नाही. आय काँग्रेसला काही जागा मिळाल्या, आम्हाला काही जागा मिळाल्या आणि शेवटी आम्ही एकत्र आलो आणि वसंतदादांना मुख्यमंत्री केले. पण आम्हा तरुणांचा त्यावेळेला काँग्रेस (आय) वर राग असायचा, असे पवार म्हणाले.
- आम्ही सगळे यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचे. त्यामुळे आमच्यात एक अंतर होते. वसंतदादा हे आम्हा लोकांचे नेते. पण त्यांनी शेवटी हे दोघे एकत्र यावेत याचे प्रयत्न सुरू केले आणि त्याला आम्हा लोकांचा विरोध होता. त्या विरोधामध्ये जे प्रमुख होते त्यामध्ये मी होतो. परिणाम काय झाला एक दिवस आम्ही ठरवले वसंतदादांचे सरकार घालवायचे आणि वसंतदादांचे सरकार आम्ही लोकांनी घालवले आणि मी मुख्यमंत्री झालो. माझ्या हातात सत्ता आली, असे पवार म्हणाले.
वसंतदादांचे सरकार मीच पाडले
