पुणे शहरात मद्यपान करून वाहन चालवण्याच्या घटनांना ऊत आला असताना आणखी एक गंभीर प्रकार समोर आला आहे. केशवनगर परिसरात काल रात्री साधारण 10 ते 10.30 दरम्यान ट्रॅफिक डीसीपी हिम्मत जाधव यांच्या कारला मद्यधुंद चालकाने धडक दिली. या अपघातात जाधव यांची मुलगी किरकोळ जखमी झाली आहे.
या घटनेनंतर मुंढवा पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून ड्रिंक अँड ड्राइव्ह अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. यासंदर्भातील सलग प्रकरणांमध्ये ही आणखी भर पडली आहे. परिसरात काही काळ वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली होती. मात्र पुढील कार्यवाहीसाठी वाहने बाजूला करण्यात आली.
या अपघातानंतर पोलिसांनी तत्काळ प्रतिसाद देत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. वाहनचालकाच्या नशेची पुष्टी करण्यासाठी वैद्यकीय तपासणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वाहनांची स्थिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अपघाताचा तपास सुरू आहे. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून संबंधित कलमान्वये पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.