- अभिनेत्री शिल्पा शिरोडकरचा अपघात झाल्याची माहिती तिने स्वतः सोशल मीडियाद्वारे दिली आहे. तिच्या गाडीला एका बसने धडक दिली. या अपघातानंतर तिने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल करताच तातडीने मदत केल्याबद्दल शिल्पाने मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत.
- शिल्पाने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हणाली, आज सिटीफ्लोची एक बस माझ्या गाडीला धडकली आणि त्यांच्या मुंबईतील ऑफिसचे प्रतिनिधी योगेश कदम आणि विलास मांकोटे सांगत आहेत की ही त्यांच्या कंपनीची जबाबदारी नाही, ती चालकाची जबाबदारी आहे. किती निर्दयी लोक आहेत हे. चालकाला असा किती पगार असेल? सोबत शिल्पाने इंस्टाग्राम स्टोरीजवर सिटीफ्लो बसने धडक दिल्यानंतर नुकसान झालेल्या तिच्या कारचे फोटो शेअर केले.
- शिल्पाने मुंबई पोलिसांचे आभार मानत पुढे म्हटले की, धन्यवाद मुंबई पोलिस. तुम्ही मला यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात सहाय्य केले. पण, त्या कंपनीने ही जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे. सिटीफ्लो, तुम्ही जर या प्रकरणासंदर्भात माझ्याशी संपर्क साधला तर त्याचे मी कौतुक करेन. सुदैवाने माझ्या स्टाफमधील कोणालाही दुखापत झाली नाही, पण काहीही होऊ शकले असते. या प्रकरणात शिल्पाला दुखापत झाली नसून ती सुखरुप आहे. मात्र शिल्पाने शेअर केलेल्या फोटोंमधून तिच्या गाडीचे नुकसान झाल्याचे दिसत आहे.
ब्रेकिंग! अभिनेत्री शिल्पा शिरोडकरचा अपघात
