‘खालिद का शिवाजी’ चित्रपटावरून वाद

Admin
1 Min Read
  • मराठी चित्रपटसृष्टीतील ‘खालिद का शिवाजी’ या आगामी चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच वादाला तोंड फोडले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा आणि खोटा इतिहास दाखवून त्यांचा अपमान केल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. हा चित्रपट 8 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे, परंतु वाढता वाद आणि निदर्शनांमुळे त्याच्यावर बंदीचे सावट आहे.
  • खालिद का शिवाजी हा चित्रपट खालिद नावाच्या मुस्लिम मुलाच्या कथेवर आधारित आहे, जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनमूल्यांचा शोध घेतो. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये “शिवाजी महाराजांच्या सैन्यात 35 टक्के मुस्लिम सैनिक होते” आणि “रायगडावर मशीद होती” असे दावे करण्यात आले आहेत, ज्याला ऐतिहासिक पुरावे नसल्याचे हिंदुत्ववादी संघटनांनी म्हटले आहे.
  • दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत शेलार यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले, ज्या निवड समितीने हा चित्रपट महोत्सवासाठी पाठवण्याची भूमिका घेतली, त्यांनी योग्य अभ्यास केला होता का? चित्रपट पाहिला होता का? कथा वाचली होती का? त्यात काही खोडसाळपणा होता का? या सर्व गोष्टींची चौकशी तातडीने करावी, असे आदेश त्यांनी दिले आहेत.
Share This Article