गेल्या चार-ते पाच वर्षांपासून तिच्याच घरात तिचा छळ केला जात असल्याचे अभिनेत्री तनुश्री दत्ताने व्हिडिओतून सांगितले होते. या व्हिडिओमुळे खळबळ उडालेली असतानाच आता तनुश्रीने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे माझ्या जीवावर उठले असल्याचा खळबळ उडवून देणारा आरोप केला आहे. मराठी वृत्त वाहिन्यांशी बोलताना तनुश्रीने हे गंभीर आरोप केले आहेत. नाना पाटेकर आणि बॉलिवूडची माफिया गँग मिळून मला त्रास देतेय, असे तनुश्री म्हणाली. तसेच नाना पाटेकरांचे गँगस्टरशी संबंध आहेत, मराठी माणूस म्हणून ते सहानुभूती घेतायत, असा आरोपही तनुश्रीने केला आहे.
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत ज्या-ज्या गोष्टी घडल्या, त्या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत घडल्या आहेत. मी शेअर केलेला व्हिडीओ म्हणजे, ते माझे चार-ते पाच वर्षांचे फ्रस्टेशन असल्याचेही तिने सांगितले. माझे फोन, ईमेल हॅक केल्यामुळे त्यांना माझ्या सगळ्या गोष्टी समजत होत्या. माझे कुठेही काहीतरी काम होत होते, ते मध्ये येऊन ते सगळे बिघडवायचे असे सांगत 2020 नंतर माझे जेवढे मोठे प्रोजेक्ट्स आहेत, त्यातून मला सिस्टमॅटिकली बाजूला केले गेल्याचेही तनुश्रीने सांगितले.
नाना पाटेकर हा एकटा नाही, बॉलिवूडमधील माफिया गँग आहे, जी या सगळ्या काळ्या करतुदींमध्ये सहभागी असल्याचा आरोपही तनुश्रीने केला आहे.