यशराज फिल्म्स आणि दिग्दर्शक मोहित सूरी यांचा बहुचर्चित प्रेम कथानक चित्रपट ‘सैयारा’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अहान पांडे आणि अनीत पड्डा यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. केवळ कथा आणि अभिनयच नव्हे, तर संगीत क्षेत्रातही ‘सैयारा’ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
या चित्रपटामार्फत सूरीने आपल्या पुढील पिढीतील कलाकारांना आहान पांडे आणि अनीत पड्डा प्रेक्षकांसमोर सादर केले आहे. हा सिनेमा पाहण्यासाठी तरुण मंडळी विशेष गर्दी करताना दिसत आहेत. थिएटरमधील काही व्हिडीओ समोर आले आहेत, ज्यात हा चित्रपट पाहताना प्रेक्षकांची वाईट अवस्था झाली आहे. कोणी ढसाढसा रडत आहे तर कोणी सदम्यात गेले आहे.
भारतातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट निर्मात्यांपैकी एक असलेल्या महेश भट्ट यांना आनंद आहे की, लोक मोहित सूरीच्या सैयारा चित्रपटात त्यांच्या ब्लॉकबस्टर आशिकीची आठवण अनुभवत आहेत.
महेश भट्ट यांचा आशिकी हा चित्रपट राहुल रॉय आणि अनु अग्रवाल यांना एका रात्रीत स्टार बनवणारा ठरला होता. या चित्रपटाने एक नवी, गहिरी आणि काळाच्या पुढे असलेली प्रेमकथा सादर करत खळबळ उडवून दिली होती. आशिकीचे संगीत देखील प्रचंड हिट ठरले होते. त्याचप्रमाणे, सैयारा चित्रपट अहान आणि अनीत पड्डा यांच्यासाठी नवे हिरो-हिरोईन म्हणून पदार्पण करणारा चित्रपट आहे. सैयाराचे गाणे देखील चार्टबस्टर ठरले आहेत आणि टायटल ट्रॅक तर सुपरहिट झाला आहे.