आरोग्य
हिवाळ्यात होतात त्वचेच्या अनेक समस्या, या टिप्स वापरा
हिवाळ्यात हवा कोरडी असते. यातूनच हिवाळ्यात त्वचेच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे हिवाळ्यात या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. साबणात अनेक रसायनांचा वापर केलेला असतो. यामुळे त्वचा कोरडी पडते.
त्यामुळेच साबणाचा वापर टाळा आणि खासकरून चेहऱ्यावर साबण लावू नका. साबण आणि डिटर्जंट तुमच्या त्वचेतील नैसर्गिक तेल काढून टाकतात आणि त्वचेला रुक्षपणा आणतात. म्हणूनच सौम्य क्लीन्सर वापरा. शिवाय चेहऱ्यावर नेहमी सौम्य फेसवॉश लावा.
हिवाळा म्हटला की थंडी आली आणि मग साहजिकच गरम पाण्याने आंघोळीचा मोह आलाच. अनेकांना नेहमीच गरम पाण्याने आंघोळ करण्याची सवय असते. मात्र गरम पाण्याने जास्त आंघोळ करू नये. यामुळे तुमच्या त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतो. परिणामी तुमची त्वचा निस्तेज दिसू लागते.
आंघोळ करताना ही गोष्ट लक्षात ठेवा. आंघोळीनंतर त्वचा टॉवेलने घासण्याची पद्धत असते. मात्र टॉवेलने तुमची त्वचा घासू नका. खासकरून हिवाळ्यात हे टाळा. कारण यामुळे त्वचेचा नैसर्गिक ओलावा कमी होऊ शकतो. आंघोळ केल्यानंतर, त्वचेवर थोडा ओलावा ठेवण्यासाठी टॉवेलने स्वतःला फक्त डॅप करा.