राजकीय
उद्धव ठाकरेंना तगडा झटका
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात गळती लागल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात महाराष्ट्रभरातील शिवसेनेचे आमदार आणि खासदार सहभागी झाले आहेत. मात्र उद्धव यांना आजपर्यंतचा सर्वांत मोठा धक्का बसला आहे.
शिंदेनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचे म्हणत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू खासदार खासदार गजानन कीर्तिकर हे शिंदे गटात सामील झाले आहेत. कीर्तिकर यांना यांना मानणारा मोठा वर्ग असून, त्यांच्या या निर्णयामुळे उद्धव यांना सर्वांत मोठा धक्का मानला जात आहे.
मागील तीन महिन्यांपासून कीर्तिकर शिंदे गटात सामील होण्याचा मुहूर्त शोधत होते. मात्र त्यांना मुहूर्त मिळाला आणि त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे पक्षप्रवेश केला. कीर्तिकर स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात.
उद्धव यांनी महाविकास आघाडीसोबत केलेल्या युतीवर कीर्तिकर यांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली होती. कीर्तिकरांनी शिंदेंची साथ दिल्याने आता त्यांच्यासोबत असलेल्या लोकसभा खासदारांची संख्या १३ वर पोहचली आहे, तर राज्यसभेचे तीन खासदार धरुन ठाकरेंकडे ९ खासदार शिल्लक आहेत.