आरोग्य

हिवाळ्यात आरोग्यासाठी संजीवनी ठरते संत्री

थंडीच्या काळात लोकांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होत असल्याचं दिसून येतं. त्यामुळे या काळात वेगवेगळ्या रोगांचं आक्रमण होण्याची शक्यता असते. आपली रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवण्यासाठी पोषक आहार घेण्याची गरज असते. खाण्यापिण्यात काही गोष्टींचा समावेश करून आपण आपली रोगप्रतिकारक शक्ती अबाधित ठेवू शकतो. 

आपली रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवणारा आणि थंडीच्या काळात आपल्या त्वचेची काळजी घेणारा पदार्थ म्हणजे संत्री. संत्र्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात मिळतं. संत्र्यामुळे आपली पचनक्षमता सुधारण्यास मदत होते. 
यात मोठ्या प्रमाणावर फायबर असतं. त्यामुळे मलावरोधाच्या त्रासापासून दिलासा मिळतो आणि दररोज पोट साफ व्हायला मदत होते. पोट साफ न होण्याची समस्या असणाऱ्यांसाठी संत्रं हे वरदान मानलं जातं. पोटातील वाढत्या चरबीवरही संत्र्याचा रस गुणकारी ठरतो. संत्रं खाण्यामुुळे शरीरातील चरबी वेगाने कमी होऊ शकते. यात असणाऱ्या फायबरमुळे दीर्घकाळ पोट भरल्याची भावना निर्माण होते. 
त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त खाण्यापासून आपली सुटका होते. वजन वाढण्याचे मूळ कारण हे प्रमाणापेक्षा जास्त खाणे, हेच असते. मात्र भूकेची भावनाच कमी झाल्याने अतिरिक्त खाण्याची इच्छा होत नाही आणि वजनवाढ टाळता येते.

Related Articles

Back to top button