मनोरंजन
एकच नंबर! कांतारा देशभरात सुपरहिट

देशात कांतारा चित्रपटाची चर्चा सुरू आहे. कन्नड भाषेतील हा चित्रपट गेल्या महिन्याभरापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ३० सप्टेंबर रोजी हा चित्रपट कन्नड भाषेत प्रदर्शित झाला होता. त्यानंतर १४ नोव्हेंबर रोजी हिंदी, तमीळ, तेलुगू, मल्याळम अशा भाषांतही हा चित्रपट डब करण्यात आला.
या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता ऋषभ शेट्टीची जोरदार चर्चा आहे. त्यानेच या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून पटकथाही त्यानेच लिहिली आहे. एकहाती तिहेरी भूमिका साकारल्याने त्याचं चौफेर कौतुक होतंय. कांतारा बॉक्स ऑफिसवर दिवसेंदिवस चमत्कार करत आहे. कर्नाटकात १४३ कोटींच्या कलेक्शनसह कन्नड मार्केटमध्ये कांताराने मोठे यश मिळवले आहे.
ऋषभ आता फक्त कन्नड अभिनेता राहिला नसून तो पॅन इंडिया अभिनेता झाला आहे. देशातील प्रत्येक प्रांतात त्याचे चाहते निर्माण झाले आहेत. या चित्रपटात ऋषभने शिवा नावाची व्यतिरेखा साकारली असून त्याने देव कोला या वनदेवतेचीही वेशभुषा केली आहे.

सध्या ऋषभची जोरदार चर्चा असली तरीही त्याला या भूमिकेसाठी खूप त्याग करावा लागला आहे. जंगलाच्या देवतेला कन्नड भाषेत कांतारे म्हटलं जातं. या नावावरूनच कांतारा असं या चित्रपटाला नाव देण्यात आलं आहे. कर्नाटकमध्ये वनदेवतेला खूप महत्त्व आहे. या वनदेवतेची वेशभुषा करून लोकनृत्य सादर केले जातात. या वनदेवतेच्या म्हणजेच कोलाच्या वेशभुषेसाठी ऋषभने नॉन व्हेज सोडलं होतं. एका मुलाखतीत त्याने हा खुलासा केला होता.