- छावा सिनेमानंतर आता मराठा साम्राज्याशी संबंधित आणखी एक सिनेमा सिनेरसिकांना पाहायला मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याच्या कहाणींवर आधारित ‘राजा शिवाजी’ नावाचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रितेश देशमुख या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहे. आज ‘राजा शिवाजी’ सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या सिनेमामध्ये चार मराठी अभिनेते मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, जितेंद्र जोशी आणि अमोल गुप्ते हे मराठमोळे कलाकार सिनेमामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत.
- या कलाकारांच्या व्यतिरिक्त सिनेमामध्ये अभिषेक बच्चन, संजय दत्त, भाग्यश्री, फरदीन खान आणि जिनिलिया देशमुख यांच्याही मुख्य भूमिका आहेत.
- रितेशसह सिनेमातील सर्वच कलाकारांनी आपापल्या सोशल मीडिया हँडलवर ‘राजा शिवाजी’ सिनेमाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. सिनेमामध्ये रितेश देशमुख स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारत आहे. ‘राजा शिवाजी’ सिनेमा एक मे 2026 रोजी बॉक्स ऑफिसवर झळकणार आहे.
ब्रेकिंग! ‘राजा शिवाजी’ येतोय! रितेश देशमुखने शेअर केले पोस्टर
