ब्रेकिंग! इंडिगोच्या विमानावर गारांचा पाऊस, २२७ प्रवाशांची पाचावर धारण

Admin
1 Min Read
  • दिल्लीहून श्रीनगरला जाणारे इंडिगोचे विमान आज वादळी वाऱ्याच्या चपाट्यात सापडल्याने श्रीनगर विमानतळावर त्याचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या विमानातून प्रवास करणाऱ्या २२७ प्रवाशांचा जीव भांड्यात पडला होता, परंतु पायलट आणि क्रू मेंबर्सच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली.
  • दरम्यान सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे इंडिगोने स्पष्ट केले. राज्यात मुसळधार पाऊस आणि मान्सूनपूर्व हवामानामुळे हवाई वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दिल्ली-श्रीनगर मार्गावरील या विमानाला बर्फाचा पाऊस आणि गारांचा मारा सहन करावा लागला, ज्यामुळे विमानाच्या पुढील भागाचे किरकोळ नुकसान झाले. विमान वादळात सैरभैर होऊन गोलाकार फिरत होते. याची जाणीव होताच पायलटने तात्काळ इमर्जन्सी लँडिंगचा निर्णय घेतला.
  • श्रीनगर विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले की, लँडिंगदरम्यान सर्व नियम आणि सूचनांचे पालन करण्यात आले आणि कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. वादळामुळे विमान हेलकावे खात असताना प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते आणि काहींनी आरडाओरडही केली. तरीही, क्रू मेंबर्स आणि पायलटने शांतपणे परिस्थिती हाताळत विमान सुखरूप उतरवले. इंडिगोने या घटनेची चौकशी सुरू केली असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री दिली आहे.
Share This Article