सोलापूर
सोलापूर! ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून गंडविले

- सोलापूर (प्रतिनिधी) गेल्याच आठवड्यात एका अनोळखी महिलेने ज्यादा पैशाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पुन्हा शहरात दुसरी घटना घडली आहे.
- पंप गोल्डमध्ये आर्थिक गुंतवणूक करून जादा नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवून ६ लाख ४२ हजार रुपयेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अनोळखी महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे.
- या घटनेची हकीकत अशी की, फिर्यादी प्रवीण चंद्रकांत विभुते (वय-३६, रा. एकतानगर, सोलापूर) यास ३ फेब्रुवारी ते ४ एप्रिल २५ दरम्यान हमे लथा टेलिग्राम आयडीवर एका अनोळखी फायनान्सरने टेलिग्राम आयडी वरून टेलिग्राम अँपद्वारे फिर्यादीशी संपर्क साधून पंप गोल्ड बिल्डिंगमध्ये गुंतवणूक करण्याचे अमिष दाखविले. त्या बदल्यात जादा नफा मिळेल असे सांगून विश्वास संपादन करीत अनोळखी महिलेने वेगवेगळ्या खात्यावर फिर्यादीस ऑनलाईन रखमा भरण्यास भाग पाडले.
- गेल्या दोन महिन्यात फिर्यादीने जवळपास ६ लाख ४२ एवढी रक्कम भरली.परंतु परतावा काही आला नाही.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येतात त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्या अनोळखी महिलेच्या विरोधात फिर्याद दिली असून त्या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.या घटनेचा अधिक तपास पुरुष निरीक्षक खोमणे हे करत आहेत.



