देश - विदेश

ब्रेकिंग! संसदेत वक्फ विधेयक सादर अन् मुस्लिम महिला रस्त्यावर

लोकसभेमध्ये आज वक्फ संशोधन विधेयक सादर करण्यात आले. या विधेयकाला विरोधी पक्षाने सातत्याने विरोध केला. हे विधेयक आधी संयुक्त संसदीय समितीकडे (जेपीसी) पाठवण्यात आले होते. त्यावर आज सभागृहात आठ तास चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर निर्णय होईल. मात्र त्याआधीच भोपाळमध्ये जल्लोष पाहायला मिळाला. मध्य प्रदेशच्या राजधानीत मुस्लिम महिलांनी वक्फ विधेयकाचे रस्त्यावर उतरून समर्थन केले. फुले आणि विधेयकाच्या स्वागताचे फलक हातात घेऊन महिलांनी मोदी जिंदाबादच्या घोषणा दिल्या.

आज लोकसभेमध्ये वक्फ विधेयक संसदेच्या पटलावर सादर करण्यात आले. विधेयक सादर झाल्यानंतर भोपाळमध्ये मुस्लिम महिलांनी विधेयकाचे स्वागत केले. मोठ्या संख्येने महिला फलक आणि फुले घेऊन रस्त्यावर उतरल्या. यावेळी महिलांनी मोदी जिंदाबादच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. महिलांसोबत काही पुरुषांनीही विधेयकाचे समर्थन केले. यावेळी मुस्लिम पुरुषांनीही घोषणा दिल्या, मोदी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा देण्यात आल्या.

दरम्यान अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी संसदेत वक्फ सुधारणा विधेयक संसदेत सादर केले. ते म्हणाले, देशभरात वक्फशी निगडित 30 हजार प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. तसेच जगातील सर्वाधिक जमीन वक्फ बोर्डाकडे आहे. तरीही मुस्लीम गरीब का आहेत? या मालमत्तांचा वापर गरीब मुस्लीमांसाठी व्हायला हवा होता, असेही ते म्हणाले.

Related Articles

Back to top button
जॉईन व्हाट्सअप ग्रुप