महाराष्ट्र

हार, शाल आणू नका, पाया तर अजिबात पडू नका, पुढारी लायकीचे नाहीत

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बीडचे पालकमंत्री आहेत. त्याचबरोबर ते पुण्याचेही पालकमंत्री आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्हा महाराष्ट्राच्या नकाशावर गेली तीच-चार महिन्यांपासून झळकत आहे. अशाच काळात परळीचे आमदार धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर पालकमंत्री या नात्याने अजितदादा वारंवार बीडला येतील, असे वाटत होते. मात्र, गेल्या महिन्या दोन महिन्यात ते आले नाहीत. मात्र, आज अजितदादा बीडच्या दौऱ्यावर होते. त्यामध्ये त्यांनी अनेक विषयांवर सडेतोड भाष्य केले.

कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजेत. स्वच्छतेचा आग्रह धरला पाहिजे. मला भेटायला येताना हार, टोपी, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्हे काही आणू नका. आई -वडिलांच्या कृपेने आणि माझ्या चुलत्यांच्या कृपेने माझे अतिशय उत्तम सुरू आहे. माझ्या पाया देखील पडू नका. आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाहीत. आई-वडिलांच्या आणि गुरूंच्या पाया पडा. मला केवळ प्रेमाचा नमस्कार करा, मला तेवढेच पुरेसे आहे, असे अजितदादा म्हणाले.

Related Articles

Back to top button