क्राईम

आधी चिमुकल्या विद्यार्थिनीच्या वडिलांसोबत प्रेम नंतर शरीरसंबंध

  • एका शिक्षिकेला शाळेत शिकणाऱ्या मुलीच्या वडिलांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी अटक केल्याची खळबळजनक घटना बंगळुरू येथे उघडकीस आली आहे. संबंधित शिक्षिकेने अन्य दोन सहकाऱ्यांसह मुलीच्या वडिलांना ब्लॅकमेल केले आणि काही लाख रुपये वसूल केले.
  • श्रीदेवी रुदागी (25) असे या शिक्षिकेचे नाव असून तिच्यासोबत गणेश काळे (38) आणि सागर (28) या दोन अन्य व्यक्तींना देखील अटक करण्यात आली आहे. तिघांनी मिळून एक विद्यार्थ्याच्या वडिलांकडून चार लाख रुपये वसूल केल्याचा आरोप आहे. तिघांनी संबंधित महिला शिक्षिका आणि मुलीचे वडील यांच्या गुप्त भेटींच्या छायाचित्रे आणि व्हिडिओंचा वापर करून त्यांना ब्लॅकमेल केले.
  • पीडित व्यक्ती एक व्यापारी आहे. जो त्याच्या पत्नी आणि तीन मुलींसोबत राहतो. त्याने 2023 मध्ये आपल्या पाच वर्षीय मुलीला शाळेत प्रवेश घेतला होता. त्यावेळी त्याची भेट शिक्षिका श्रीदेवीशी झाली. पीडित व्यक्तीने सांगितले की, श्रीदेवीने त्याच्याशी संपर्क ठेवला आणि त्यांनी एकमेकांना संदेश पाठवणे तसेच व्हिडिओ कॉल्सवर बोलणे सुरू केले.
  • जेव्हा त्यांच्या भेटी वैयक्तिक झाल्या. श्रीदेवीने या भेटीचा वापर करून त्याच्याकडून चार लाख रुपये वसूल केले. नंतर जानेवारीमध्ये तिने 15 लाख रुपयांची मागणी केली.
  • दरम्यान पीडित व्यक्तीने त्याच्या कुटुंबाला गुजरातमध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. ज्यासाठी त्याला मुलीच्या ट्रान्सफर सर्टिफिकेटची आवश्यकता होती. जेव्हा तो सर्टिफिकेट मिळवण्यासाठी गेला. तेव्हा तिघांनी त्याला अडवले आणि त्याला खाजगी छायाचित्रे आणि व्हिडिओ दाखवले. आरोपींनी त्याच्याकडून 20 लाख रुपयांची मागणी केली.
  • पीडित व्यक्तीने 1.9 लाख रुपये ट्रान्सफर केले. पण त्यानंतरही मागण्या सुरूच राहिल्या. जेव्हा श्रीदेवीने अधिक पैशांसाठी त्याला त्रास देणे सुरू ठेवले. तेव्हा पीडित व्यक्तीने पोलिसांना कॉल केला. पोलिसांनी तिघांना अटक केली असून आरोपींना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button