बिजनेस
ब्रेकिंग! सोन्याचे दर एक लाखांवर जाणार?

- राज्यात नववर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यात आले आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेकांनी सोनं देखील खरेदी केले. गुढीपाडव्यानंतर सोन्याचे कमी होतील असा काहींचा अंदाज होता. परंतु, सोन्याने पुन्हा उसळी घेतली. पाडव्यानंतर दुसऱ्याच दिवशी सोनं एक हजार रुपयांनी महाग झाले. त्यामुळे येत्या काळात सोन्याचे दर काय असणार? याबाबत चर्चा होत आहे. अशातच सोन्याची भाववाढ अशीच सुरू राहिल्यास अक्षयतृतीयेला सोन्याचे दर प्रति तोळा एक लाखांवर जाण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
- सध्याच्या अस्थिर जागतिक परिस्थितीमुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळत आहेत. अनेक देश आपला सोन्याचा साठा वाढवत असल्यामुळे जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. युरोपियन देशांमधील महागाई आणि अमेरिका, चीन यांसारख्या देशांतील आर्थिक अनिश्चितता यामुळे सोन्याची मागणी वाढली आहे.
- सध्या शेअर बाजारात मोठी घसरण होत असल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष आता सोन्याच्या बाजाराकडे वळले आहे. परिणामी, सोन्याच्या किमती आणखी वाढू शकतात. सध्या लग्नसराई आणि अक्षय तृतीया सारख्या सणांमुळे बाजारात सोन्याची मागणी अधिक आहे. त्यामुळे स्थानिक बाजारातही सोन्याचे दर वाढण्याची शक्यता आहे.



