देश - विदेश
ब्रेकिंग! गोध्रा दंगलीबाबत मोदी पहिल्यांदाच थेट बोलले

- अमेरिकी पॉडकास्टर लेक्स फ्रिडमन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मॅराथॉन मुलाखत घेतली. ही मुलाखत जवळपास तीन तास चालली. या मुलाखतीत मोदींनी अनेक मोठे खुलासे केले आहेत. त्यात त्यांनी गोध्रा हत्याकांडाबाबत ही काही खुलासे केले आहेत. शिवाय लोकशाही, आरएसएस, टीकाकार, यांच्याबाबतही त्यांनी आपली मत मांडली आहेत. पण
- गोध्रा दंगलीबाबत ते मोकळे पणाने बोलले. त्यांची ही मुलाखत नुकतीच प्रदर्शित झाली आहे.
- 27 फेब्रुवारी 2002 साली कारसेवक असलेल्या साबरमती एक्सप्रेसला आग लावण्यात आली होती. त्यात महिला आणि लहान मुलांसह 59 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गुजरातमध्ये दंगल उसळली होती. त्यात शेकडो लोकांना आपला जीव गमवाला लागला होता. ही एक अकल्पनीय दुर्घटना होती असं पंतप्रधान मोदी म्हणाले. ज्या दिवशी ही घटना घडली त्यावेळी आम्ही विधानसभेत होतो. आमदार होवून आपल्याला केवळ तीन दिवस झाले होते. त्याच वेळी ही घटना घडली. लोकांना जिवंत जाळले गेले होते, असे मोदी म्हणाले.
- गोध्रामध्ये जे काही झाले ते चुकीचे झाले. काहींनी हिंसा केली. त्यावेळी केंद्रात आमच्या विरोधातील सरकार होते. त्यांनी आमच्या सरकारवर आरोप लावले. पण आम्हाला न्याय देवतेने न्याय दिला. आमचे सरकार निर्दोष ठरले, असेही मोदी म्हणाले. त्यानंतर गुजरातमध्ये एकही मोठी दंगल झाली नाही. यासाठी त्यांनी गुजरातच्या जनतेचे आभारही मानले.