देश - विदेश

तुम्ही मृत्यूला घाबरता का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रसिद्ध पॉडकास्टर लेक्स फ्रिडमॅन यांच्या पॉडकास्ट झाला. पॉडकास्ट तब्बल सव्वा तीन तासांचा आहे. मोदींनी या पॉडकास्टमध्ये त्यांच्या आयुष्यातील विविध घडामोडींवर भाष्य केले.

अमेरिकेचा पॉडकास्टर लेक्स फ्रिडमॅनने मोदींना अनेक प्रश्न विचारले. तुम्ही मृत्यूवर विचार करता का, तुम्हाला मृत्यूचे भय वाटते का, यावर मोदींनी हसत हसत उत्तर दिले. मी तुम्हाला या प्रश्नाच्या बदल्यात एक प्रश्न करू शकतो? जन्मानंतर जीवन आणि मृत्यू दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. परंतु दोघांमध्ये कोणती घटना निश्चित आहे? त्यानंतर स्वत:च मृत्यू उत्तर दिले. ज्या व्यक्तीचा जन्म होतो, त्यांचा मृत्यू निश्चित असतो.

मोदींनी पुढे म्हटले की, जे निश्चित आहे, त्याची भीती कसली? संपूर्ण वेळ जीवनावर खर्च करा. तुम्ही मृत्यूचा विचार करू नका. या पद्धतीने जीवनाचा विकास होईल. तसेच समृद्धी मिळेल. यासाठी मेहनत करावी लागेल. तुमच्या सवयी बदलाव्या लागतील. मृत्यूआधी जीवनाचा उद्देश पूर्ण होईल. मृत्यूच्या भीतीला घाबरू नये. मृत्यू येणारच आहे, तर तो कधी येणार, त्याची चिंता करून फायदा नाही. जेव्हा मृत्यू येईल, तेव्हा येईल.

Related Articles

Back to top button