महाराष्ट्र
शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराजांना काय त्रास झाला आहे हे नाकारता येत नाही, अशा नराधमांना…

- औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात आता चांगलेच वातावरण पेटले आहे. महायुतीमधील मंत्र्यांनीच औरंगजेबाची खुलताबाद येथील कबर हटविण्याची मागणी केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी कबर ठेवणे योग्य आहे. त्यामुळे इतिहास कळते असे म्हटले आहे. त्याला आता जलसपंदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
- विखे म्हणाले, कबर हटविण्याबाबत लोकभावना आहोत. त्याचा आदर केला पाहिजे. इतिहास त्याला साक्षीदार आहे. आक्रमणामुळे हिंदू-देवतांची, देवळांची मोडतोड झाली. हिंदू संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. तो डाव होता. त्यामुळे औरंगजेबाची कबर राहणे हे अतशिय योग्य नाही ? हिंदुत्ववादी संघटनांनी भावना व्यक्त केल्या आहेत. लोकभावनाचा आदर केला पाहिजे.
- पण कोण काय म्हणतो, याच्याकडे लक्ष्य देण्याची आवश्यकता नाही. आता पुढे गेले पाहिजे. विनाकारण भावनिक आधार देत लोकांना इतिहास माहिती पाहिजे, असे सांगतात. त्यांना तरी देशाचा इतिहास माहिती आहे का ? असा टोला विखे यांनी लगावला आहे.
- छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना काय त्रास झाला आहे हे नाकारता येत नाही, अशा नराधमांना आपल्या इतिहासामध्ये जागाच नको आहे, असे विखे म्हणाले.