क्राईम
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आणखी एका युवकाची क्रूरपणे हत्या

- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची तीन महिन्यांपूर्वी हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येचे फोटो काही दिवसांपूर्वीच समोर आल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली.
- यानंतर आता एका 19 वर्षीय तरुणाच्या क्रूर हत्येची माहिती समोर येत आहे. तरुणाचे शीर आणि दोन्ही हात-पाय कापून कापले. त्यानंतर तरुणाचे धड एका पोत्यात आणि शीर, हात-पाय दुसऱ्या पोत्यात भरून विहिरीत फेकले. तरुणाच्या हत्येची माहिती समोर आल्यानंतर अहिल्यानगर हादरले आहे.
- श्रीगोंदा तालुक्याचे सीमेवर असणाऱ्या दाणेवाडी गावामध्ये हा प्रकार घडला आहे. माऊली सतीश गव्हाणे असे त्या युवकाचे नाव आहे.
- अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्याचे सीमेवर असणाऱ्या दाणेवाडी गावामध्ये माऊली सतीश गव्हाणे (वय १९) या तरुणाची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली. निर्घृण खुनामागील नेमके कारण अजून समोर आले नाही. माऊली सतीश गव्हाणे हा बारावीचा विद्यार्थी आहे. त्याचा खून करताना आरोपींनी त्याचे दोन्ही हात पाय अन् मुंडके छाटले.
- मयताचे शीर, हात, पाय हे झाडे कट करण्याच्या स्वयंचलित कटरने कपल्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याचे धड एका पोत्यात तर पाय, हात आणि डोके एका पोत्यात भरले. हे दोन्ही गाठोडे त्यामध्ये मोठे दगड भरून दानेवाडी नदीच्या बाजूला असणाऱ्या विहिरींमध्ये टाकून दिले होते.
- पोलिसांना हे मृतदेह मिळाल्यानंतर माऊलीच्या नातेवाईकांना बोलवण्यात आले. त्यांनी तो माऊलीच असल्याचे सांगितले. क्रूर हत्येच्या या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे.
- माऊली याचा सात मार्च रोजी बारावीचा पेपर होता. तो पेपर देण्यासाठी त्याच्या दाणेवाडी येथील घरुन शिरूर येथे गेला होता. पेपर दिल्यानंतर परत तो घरीच आला नाही. तो बेपत्ता झाला होता. त्यानंतर गावाजवळ असणाऱ्या एका विहिरीत त्याचा मृतदेह सापडला होता.