देश - विदेश

वारंवार रडून काश्मीर तुमचा होईल का? भारताने काढली पाकिस्तानची हवा

  • संयुक्त राष्टाच्या बैठकीत पाकिस्तानने पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर भारताचे प्रतिनिधी पार्वथानेनी हरिश यांनी या दाव्यांना जोरदार प्रतिउत्तर दिले. पाकिस्तानने कितीही वेळा हा मुद्दा उपस्थित केला तरी जम्मू-काश्मीरचे वास्तव बदलणार नाही. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता आणि राहील, अशा शब्दांत हरीश यांनी पाकिस्तानला सुनावले.
  • संयुक्त राष्ट्रात इस्लामोफोबियाचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात भारताकडून पार्वथानेनी यांनी प्रतिनिधीत्व केले. त्यांनी पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानच्या अलीकडील विधानावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, नेहमीप्रमाणे पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र सचिवांनी कोणत्याही कारणाशिवाय भारतीय केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीरचा उल्लेख केला. पार्वतानेनी यांनी स्पष्ट केले की, जम्मू आणि काश्मीरचा मुद्दा वारंवार उपस्थित केल्याने पाकिस्तानचा दावा सिद्ध होणार नाही किंवा सीमापार दहशतवादाचे समर्थन होणार नाही.
  • पाकिस्तानमध्ये झालेल्या ट्रेन अपहरणाला पाकिस्तानने भारताला जबाबदार धरले होते. त्यानंतर आयोजित या बैठकीत पार्वथानेनी यांनी पाकिस्तानला जोरदार उत्तर दिले. ते म्हणाले की, जागतिक दहशतवादाचे खरे केंद्र कुठे आहे, हे संपूर्ण जगाला चांगलेच माहिती आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये होणाऱ्या अशा घटनांना भारताला जबाबदार धरुन पाकिस्तानने स्वतःचेच हसू करुन घेतले आहे.

Related Articles

Back to top button