देश - विदेश

ब्रेकिंग! भारताच्या आणखी एका शत्रूचा गेम ओव्हर

  • लष्कर-ए-तोएबा या दहशतवादी संघटनेचा मोस्ट वाँटेड अतिरेकी फैसल नदीम उर्फ अबू कताल याची काल पाकिस्तानात हत्या करण्यात आली. कताल हा एनआयएचा मोस्ट वाँटेड आतंकी होता. काश्मिरातील अनेक दहशतवादी हल्ल्यात याच कतालचा हात होता. 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद याचा निकटवर्तीय म्हणून कताल ओळखला जात होता. मागील काही काळापासून पाकिस्तानात लपून बसलेल्या भारताच्या शत्रूंची अशाच पद्धतीने हत्या सुरू आहे.
  • पाकव्याप्त काश्मीरातील झेलममध्ये काल रात्री कतालची हत्या करण्यात आली. अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. यात कतालचा मृत्यू झाला. हाच कताल पीओकेत बसून जम्मू काश्मीरात सातत्याने हल्ल्यांचे कट रचत होता. इतकेच नाही तर हाफिज सईदने जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या हल्ल्याची जबाबदारी कतालला दिली होती. हाफिजने त्याला लष्करचा चीफ ऑपरेशनल कमांडर बनवले होते. हाफिजकडूनच त्याला आदेश मिळायचे. यानंतर तो काश्मीरमध्ये मोठ्या हल्ल्यांची अंमलबजावणी करत होता.
  • जून महिन्यात रियासी येथे झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड कतालच होता. 2023 मधील राजौरी हल्ल्यात सहभागासाठी एनआयएच्या चार्जशीटमध्ये अबू कतालचे नाव होते. एक जानेवारी 2023 रोजी राजौरीतील ढांगरी गावात हल्ला झाला होता. या हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी एक आयईडी स्फोट झाला होता. यात सात लोकांचा मृत्यू झाला होता तर अनेक लोक जखमी झाले होते. या हल्ल्याच्या संदर्भात एनआयएने आपल्या चार्जशीटमध्ये लष्कर-ए-तोएबाच्या तीन हँडलर्सचे नाव घेतले होते. कतालच्या सूचनांनुसार दहशतवाद्यांनी लॉजिस्टिकची मदत घेतल्याचे तपासात आढळून आले होते.

Related Articles

Back to top button