महाराष्ट्र

औरंगजेबाच्या कबरीला हात लावला तर…

  • मागील काही दिवसांपासून राज्याचे राजकारण औरंगजेबाच्या कबरीवरून चांगलेच तापले आहे. भाजप मंत्री नितेश राणे यांनी ही कबर उखडून टाकण्याचे वक्तव्य केले. त्यामुळे खुलताबाद येथे कबर परिसरात मोठा बंदोबस्त आहे. तर याउलट राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी कबरीला हात न लावण्याचे वक्तव्य केले आहे.
  • पवार म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये औरंगजेब 27 वर्षे राहिला. त्यानंतर देखील त्याला महाराष्ट्रात राज्य करता आलेले नाही. याचेच प्रतिक म्हणून खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबच्या कबरीला हात न लावणेच योग्य ठरेल. ही कबर आज आपण उखडून टाकली तर भविष्यामध्ये लोक गडबड करतील. त्यामुळे कबरीला हात न लावण्याचे आवाहन पवारांनी केले आहे.
  • यापूर्वी शरद पवार गटाचे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी देखील औरंगजेबाची कबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक असल्याचा दावा केला होता. हा इतिहास पुढील पिढीला कळला पाहिजे, त्यामुळे कबर हटवू नका, असे म्हणाले होते.
  • तर दुसरीकडे अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी औरंगजेबची कबर काढून टाकण्यासंदर्भात वक्तव्य केले होते. त्यानंतर रोहित पवारांनी आज कबरीला हात न लावण्याचे भाष्य केले आहे. त्यामुळे शरद पवार गटात अंतर्गत मतभेद असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

Related Articles

Back to top button