क्राईम
प्रेम प्रकरणातून बेदम मारहाण, १४ दिवस मृत्यूशी झुंज

- प्रेम प्रकरणातून मारहाण झालेल्या १८ वर्षीय तरुणाची अखेर मृत्यूशी झुंज संपली आहे. धाराशिव जिल्ह्यातील या तरुणाला प्रेम प्रकरणातून बेदम मारहाण झाली होती. या तरुणाचे नाव माऊली गिरी असे असून त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात माऊलीवर १४ दिवस उपचार सुरु होते.
- माऊलीला प्रेम प्रकरणातून बेदम मारहाण झाली होती. मारहाणीनंतर तो शुद्धीवरच नसल्याचे त्याच्या आई-वडिलांनी सांगितले. संबंधित सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी माऊलीच्या आई-वडिलांनी केली आहे. या प्रकरणाची धाराशिव जिल्ह्यातील आंबे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. माऊलीचा सोलापुरातील खासगी हॉस्पिटल मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी गर्दी केली.
- धाराशिव जिल्ह्यातील भूम इथे माऊली लोखंडी रॉड, काठीने अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली होती. मारहाणीनंतर माऊलीला मृत समजून भूम तालुक्यातील पांढरेवाडी शिवारात विवस्त्र अवस्थेत फेकून देण्यात आले होते. सात ते आठ जणांच्या टोळक्याकडून मारहाण करण्यात आली होती. पाठीपासून तळपायापर्यंत बेदम मारहाण करण्यात आली होती. माऊली मृत झाल्याचे समजून रस्त्यालगत विवस्त्र अवस्थेत फेकून दिले होते.
- या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या माऊलीची मृत्यूशी झुंज आज संपली. दरम्यान यातील मुख्य आरोपी सतीश जगतापसह सात जणांविरोधात अंबी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. तर इतर आरोपी फरार आहेत.