ब्रेकिंग! राज्यात रेल्वेचा मोठा अपघात

राज्यात आज पहाटे चार वाजता मोठा अपघात घडला आहे. मुंबईहून अमरावतीकडे जाणाऱ्या रेल्वेला पहाटे एका ट्रकने जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात घडला. हा अपघात रेल्वे फाटकाजवळ झाला असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातानंतर रेल्वे आणि स्थानिक प्रशासनाने तत्काळ मदतकार्य सुरू केले. घटनास्थळी पोलीस आणि आपत्कालीन सेवा तैनात करण्यात आली असून रेल्वे मार्ग लवकरच सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
बोदवड नाढगावजवळ रेल्वे गेट तोडून एक धान्याने भरलेला एक ट्रक अडकून पडलेला होता. आज पहाटे सुमारास मुंबईहून अमरावतीकडे जाणाऱ्या अमरावती एक्सप्रेसची धडक या ट्रकला बसल्याने अपघात झाला. रेल्वे चालकाने दाखविलेल्या सूचकतेमुळे रेल्वेची गती अतिशय कमी होती. अपघात झाला असला तरी जीवितहानी मात्र झाली नसल्याची माहिती आहे.
अपघात झालेला ट्रक रेल्वेत अडकून पडला असल्यानं त्याला काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या अपघातामुळे नागपूर भुसावळ रेल्वे वाहतूक दोन्ही बाजूने ठप्प झाल्या आहेत. अनेक प्रवासी गाड्या मलकापूर ,नांदुरा, शेगाव, अकोला स्थानकात अडकल्या. तसेच सणासुदीच्या दिवशी रेल्वे प्रवाशांचे हाल झाले आहे.