राजकीय
‘त्या’ नेत्यांवर लक्ष ठेवा, अमित शहांच्या शिंदे, फडणवीस, दादांना सूचना
- राज्यात पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी केली जात आहे. यंदाची विधानसभा निवडणूक अटीतटीची होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, महायुतीच्या तीनही घटक पक्षांकडून आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.
- मात्र अजूनही अशा काही विधानसभेच्या जागा आहेत, त्यावर अद्यापही तोडगा निघाला नसल्याने तिथे महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही. अशा जागांसाठी केंद्रीयमंत्री अमित शहांच्या दिल्ली येथील निवासस्थानी महायुतीची काल बैठक पार पडली. यावेळी शहांनी महायुतीमधील नेत्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
- काही विधानसभा मतदारसंघावर महायुतीमधील एका पेक्षा अधिक उमेदवारांनी दावा केला आहे. आता हा तिढा दिल्ली दरबारीच सुटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शहांसोबत बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार शहांची नजर महायुतीच्या बंडखोरांवर आहे.
- महायुतीच्या कुठल्याही पक्षाचे बंडखोर उभे राहणार नाहीत, मतविभाजन टाळण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकजुटीने निवडणुका लढवण्याचे आवाहनही त्यांनी केले. याची काळजी घेण्याच्या सूचना शहा यांनी दिल्या आहेत