खेळ
चॅम्पियन्स ट्रॉफी गमावल्यानंतर न्यूझीलंड क्रिकेटमध्ये भूकंप

- आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव करत तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे. तर दुसरीकडे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 नंतर न्यूझीलंड क्रिकेटमध्ये बदल पाहायला मिळत आहेत.
- 16 मार्चपासून पाकिस्तानसोबत न्यूझीलंड घरच्या मैदानावर पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी न्यूझीलंडने आपल्या संघात मोठे बदल केले आहेत. या मालिकेसाठी न्यूझीलंडने आपला कर्णधार देखील बदलला आहे. तसेच आणखी सात खेळाडूंना बाहेरचा रास्ता दाखवला आहे.
- पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या मालिकेसाठी न्यूझीलंडने मिचेल सँटनरच्या जागी मायकेल ब्रेसवेलला संघाची कमांड दिली आहे. कर्णधार मिचेल सँटनर आणि न्यूझीलंडचे आठ खेळाडू आयपीएल खेळणार असल्याने न्यूझीलंडने पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या मालिकेसाठी आठ बदल केले आहे. पाकिस्तानविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका 16 मार्चपासून सुरु होणार आहे.